शाहूवाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खालील प्रमाणे रस्ते बंद झालेले आहेत.

शाहुवाडी प्रतिनिधी :
शाहुवाडी येथे अतिवृष्टी ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक पूर्ण पणे बंद झाली आहे. कोल्हापुरहुन रत्नागिरी ला जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे.
1)जाधववाडी निळे या ठिकाणी पाणी आलेने कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे बंद झालेला आहे तसेच
2) बरकी गावचे पुलावर पाणी आलेने बरकी गावचा संपर्क तुटलेला आहे
3) मालेवाडी ते सोंडोली जाणारे पुलावर पाणी आलेने शिततुर वारून, शिराळे वारून, उखळू, खेडे, सोंडोली कडे रस्ता बंद झालेला आहे.
4)सोष्टेवाडी जवळ पाणी आलेने मलकापूर ते अनुस्कुरा रोड बंद झालेला आहे .
5)कडवी नदी पुलावर पाणी आलेने मलकापूर ते शिरगाव रोड बंद झालेला आहे
6) चरण ते डोणोली रोड बंद झालेला आहे.
7)नांदारी फाट्यावर पाणी आलेने करंजफेन, माळापुडे, पेंढाखले रोड बंद झालेला आहे.
8) करुंगळे ते निळे व कडवे ते निळे रोड बंद झालेला आहे उचत ते परळे रोड बंद झालेला आहे
पोलीस निरीक्षक
शाहूवाडी पोलीस ठाणे