ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रमिकांच्या उन्नतीसाठी व त्यांच्या न्याय , हक्कासाठी श्रमिक चळवळ आवश्यक : दलितमित्र प्रा . डी.डी. चौगले

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

समाजाचा खरा आधार श्रमिक आहे त्यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून म्हणावी तितकी दखल घेतली जात नाही . त्यामूळे न्याय व हक्कासाठी श्रमिकांची चळवळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन दलितमित्र प्रा .डीं .डी. चौगले यांनी केले .
मुरगुड येथील समाजवादी प्रबोधिनी शाखेच्या वतीने कै . अनंत बारदेस्कर यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रम गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात दलितमित्र प्रा . चौगले बोलत होते . अध्यक्षस्थानी मुरगूड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक – हे होते . तर पत्रकार प्रा सुनिल डेळेकर प्रमुख उपस्थित होते .

मुरगूड नगरपालिकेचे सफाई कामगारांचे मुकादम भिकाजी कांबळे यांना यावेळी श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . प्रथम कै . अनंतराव बारदेस्कर स्मृती ‘दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासह कैं . नायकवडी , केे .एन.डी. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले .

स्वागत कॉ . बबन बारदेस्कर यांनी केले .बी.एस. खामकर यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमास पी.आर. पाटील , तानाजी कांबळे , सिकंदर जमादार , मोहन कांबळे आदि उपस्थित होते . रणजित कदम यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप वर्णे यांनी आभार मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks