ताज्या बातम्या

इब्राहिमपूर येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

इब्राहिमपूर तालुका चंदगड येथील ग्रामस्थांच्या वतीने बागीलगे डुक्करवाडी विद्यालयाचे सेवानिवृत् शिक्षक महादेव बानेकर व येथील साई विद्यालयाचे शिपाई सुरेश शिंदे हे दोघेही सेवानिवृत्त झालेने त्यांचा सत्कार समारंभ चंदगडचे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सरपंच निळकंठ देसाई यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर सेवानिवृत्त शिक्षक महादेव बानेकर यांचा सत्कार रामचंद्र मगर व विठोबा कदम यांचे हस्ते तर सेवानिवृत्त शिपाई सुरेश शिंदे यांचा सत्कार तुकाराम पानोरे व वसन्त देसाई यांचे हस्ते झाला यानंतर महात्मा फुले विकास संस्थेचे माजी चेअरमन रामचंद्र मगर ,सेवानिवृत्त ए एस आय विठोबा कदम ,पत्रकार पुंडलिक सुतार यांचाही यावेळी सत्कार झाला मनोगत व्यक्त करताना सरपंच निळकंठ देसाई म्हणाले की बानेकर सरानी खूप चांगले विद्यार्थी घडविले असून त्यांच्या संस्काराची शिदोरी गाव विसरणार नाही असे सांगितले यानंतर बोलताना बानेकर सर म्हणाले की आजचा सत्कार सर्व सत्कारापेक्षा मोठा असून सत्काराने मी खूप भारावून गेलो आहे असे सांगितले.

पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर म्हणाले की माणूस व समाज घडविणेचे काम शिक्षक करतात त्यांचे ऋण आपल्याला विसरून चालणार नाही असे सांगून आपल्या गावासाठी माझे कायम सहकार्य राहील असे सांगितले सूत्रसंचालन शिवाजी हरेर सर यांनी करून आभार मानले यावेळी उपसरपंच तुकाराम हरेर ,सदस्य सौ तुळसा परीट,सौ विद्या सुपल ,मुख्याध्यापक उत्तम पाटील,कुंभार सर,सतबा सुतार,विलास नार्वेकर,चंद्रकांत सावन्त शिपाई अनंत कदम,सागर कांबळे,संभाजी घुरे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks