कोवाड चे सेवानिवृत्त सुभेदार महेश किणगी यांचे निधन

चंदगड :पुंडलिक सुतार
कोवाड तालुका चंदगड चे सुपुत्र व भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त सुभेदार महेश सत्यापा किणगी वय 55 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्व जवान महेश किणगी भारतीय सैन्यात 5 डिसेंबर 1984 साली बेळगाव येथे आर्मी मेडिकल क्रॉप्स रेजिमेंटला अंबुलन्स सहायक जी डी पदावर भरती झाले त्यांचे प्रशिक्षण लखनऊ येथे झालेवर त्यांनी सेवाकाळात जम्मू,झाशी,कपूरथला,अगरतला,धारंगधरा,फतेघड़,जालंधर,लेह,भाटिंडा,कोयंबटूर,व शेवटी पुणे-खडकी अशा विविध ठिकाणी त्यांनी सैन्यात 30 वर्ष 28 दिवस उल्लेखनीय अशी सेवा बजावून 1 जानेवारी 2015 ला ते सेवानिवृत्त झाले होते सेवाकाळात त्यांनी जी डी, लान्स नायक,नायक,हवलदार, नायब सुभेदार,सुभेदार,हॉनरेरी सुभेदार मेजर अशा विविध पदावर त्यांनी सेवा बजावली असून सैन्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना सामान्य सेवा मेडल मिझोराम,स्पेशल सर्विस मेडल,सैन्य सेवा मेडल काश्मीर,उच्च तुंगता मेडल,सुवर्ण मेडल,लॉंग सर्व्हिस मेडल 20 व 9 वर्ष करिता,अशी विविध मेडल्स त्यांना मिळाली होती त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती माला,मुलगी प्रियांका,मुले प्रदीप,पवन असा परिवार आहे