ताज्या बातम्यानिधन वार्ता
मलगेवाडी येथील सेवानिवृत्त पी. एस. आय. आप्पासाहेब नाईक यांचे निधन

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
मलगेवाडी तालुका चंदगड येथील सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पी एस आय आप्पासाहेब धोंडिबा नाईक वय 62 वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वरळी मुख्यालय ,नागपाडा,जुहू,डी एन नगर,भुईवाडा,प्रोटेक्शन ब्रँच आदी ठिकाणी त्यांनी 58 वर्ष उत्कृष्ठ अशी सेवा बजावून सन 2017 साली ते पी एस आय पदावरून सेवानिवृत्त झाले स्वयंशिस्त,गैरहजर न राहणे याबद्दल त्यांना रिवार्डस मिळाले आहेत. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,व चार मुली असा परिवार आहे.