कोदवडे येथे आज मोफत आरोग्य शिबीर

कौलव प्रतिनिधी :
कोदवडे ग्रामपंचायत व अथायू हाँस्पिटल कोल्हापूर यांच्यावतीने कोदवडे ता राधानगरी येथे बुधवारी दि २९ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वा पर्यंत मोफत रोगनिदान शिबिर आयोजित केले आहेत.अशी माहिती सरपंच सौ. मंगल धनाजीराव पाटील व माजी यशवंत सरपंच धनाजीराव पाटील यांनी आवाहन केले आहे.

शिबिरात ह्रदय रोग,मेंदू व मणका,कर्करोग,खुबा व गुडघेदुखी,मुत्र व किडणी विकार आदी मोफत तपासणी करण्यात येईल.तर रक्तातील साखर, ब्लडप्रेशर व ई सी जी मोफत काढून देण्यात येणार आहे.तरी कोदवडे व राशिवडे पंचक्रोशीतील सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.या शिबिरात कोणतीही तपासणी फी आकारणी केली जाणार नाही.तसेच महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत येणारे सर्व आजारावर उपचार मोफत केले जाणार आहेत.तरी सर्वांनी आपली नाव नोंदणी संपर्क कृष्णात पाटील ९९२२९४१४१४ यांच्याशी संपर्क साधावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे.