मुरगुडच्या लक्ष्मी नारायण संस्थेतर्फे ९० लाखांच्या १४ वाहनाचे वितरण ; ९ चारचाकी व ५ दुचाकीचा समावेश

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील ‘सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेतर्फे नवीन वाहन खरेदी योजनेअंतर्गत ९० लाख रूपये खर्चाच्या १४ वाहनाचे वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे नुतन सभापती श्री किशोर विष्णूपंत पोतदार यांनी दिली.
‘’संस्थेच्या विविध शाखांत घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून नूतन वाहन कार्यक्रमातून कर्जदारांचे वाहन पूजन व वाहनाच्या चाव्या वितरणांचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आल्याचे सांगून श्री पोतदार म्हणाले ” वितरीत नवीन वाहनामध्ये ९ चारचाकी व ५ दुचाकी वाहनाचा समावेश आहे.
सदर वाहन वितरण कार्यक्रमांस उपसभापती श्री दतात्राय कांबळे व जेष्ठ संचालक श्री. जवाहर शहा सर्वश्री संचालक श्री. पुंडलीक डाफळे श्री. दत्तात्रय तांबट, श्री अनंत फर्नांडीस चंद्रकांत माळवदे, विनय पोतदार, रविंद्र खराडे, रविद्र महादेव सणगर, संचालिका सौ सुजाता सुतार, सौ. सुनिता सुशांत शिंदे तज्ञ संचालक जगदीश देशपांडे व श्रीमती भारती कामत कार्यलक्षी संचालक श्री नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर, सर्व शाखाधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.
शाखावार कर्ज वितरण ग्राहकांचे नांव त्यांला देण्यात आलेले वाहनकर्ज अनुक्रमे असे
१ शाखा कापशी (ता कागल) 1 एकून कर्ज वितरण ४० लाख ३५ हजार
२. शाखा सावर्डे बु (ता कागल) एकुण कर्ज वितरण २५ लाख ६ हजार
१३. शाखा सरवडे ता राधानगरी
४ शाखा मुरगूड ता कागल
एकूण कर्ज वितरण १० लाख ६२ हजार
एकूण कर्ज वितरण १५ लाख ०५ हजार