ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर, सांगलीला दिलासा ! अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

बेळगाव :
अलमट्टी धरणात चार दिवसांपासून पाण्याची आवक वाढू लागल्याने आज (बुधवार) सकाळी 8 वाजल्यापासून धरणातील विसर्ग सव्वा लाख क्युसेक करण्यात आला आहे. काल (मंगळवार) हा विसर्ग एक लाख होता. अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 टीएमसी असून, या धरणामध्ये सध्या 115.546 टीएमसी पाणीसाठा आहे.
या धरणात 1 लाख 2 हजार 186 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. या धरणातून बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धरण आता 95 टक्क्यावरुन 93.93 टक्क्यावर आले आहे.