पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कारणांसाठीची वसुली भोवली ; इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे तीन पोलीस निलंबित

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आषाढातील जत्रेनिमित्त परिसरातील व्यावसायिकांकडून आर्थिक स्वरूपात हप्ते उकळल्याच्या कारणावरून इस्पुर्ली ता. करवीर येथील पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अजित देसाई, पोलीस हवालदार कृष्णात यादव व कॉन्स्टेबल पंकज बारड या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर सोमवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक वीरकुमार गुप्ता यांनी निलंबनाची कारवाई केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, याच ठाण्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून थेट पैशाची मागणी केली असता त्या संबंधित अधिकाऱ्याने त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून ट्रान्सफर केलेल्या पैशाचा स्क्रीनशॉट पोलीस अधीक्षकांना दाखवून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी करवीर उपाधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याकडे दिली असता सोमवारी रात्री उशिरा त्या तिघांना तपासासाठी पोलीस अधीक्षकांच्या समोर हजर केले असता हे तपासणीच्या दरम्यान हे तीन पोलीस कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर पुढील आदेश येईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दोषी आढळलेल्या या तीन आढळलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आषाढ जत्रेनिमित्त परिसरातली व्यवसायिकांच्याकडून आर्थिक स्वरूपात हप्ते घेतले, माळुंगे तालुका करवीर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेल्या एकमे पेक्षा रेकॉर्डवर प्रत्यक्षात कमी रक्कम दाखवने तसेच करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये एसी बसवण्याच्या कारणावरून परिसरातील व्यवसायिकांच्या कडून पैसे उकळल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
एकाच वेळी एकाच ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दल ही हादरले असून परिसरातील ग्रामस्थांकडून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे.