क्रीडाताज्या बातम्या
नेसरी येथे खेळाडूंचा सत्कार

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नेसरी येथे राज्यस्तरीय धावणे, भालाफेक व कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाले बद्दल शिवसेना व युवासेना शाखेच्या वतीने युवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भूषण पाटील यांचा सत्कार युवासेना तालुका समन्वयक शेहजाद वाटंगी,ओंकार पाटील यांचा सत्कार युवासेना उपतालुका अधिकारी श्रीहरी भोपळे, प्रथमेश कांबळे यांचा सत्कार नेसरी शहर समनव्यक सचिन नाईक, सोहम नांदवडेकर यांचा सत्कार नेसरी युवासेना शहरप्रमुख अक्षय डवरी यांच्या हस्ते करण्यात आला..!शिवसेना माजी उपतालुका प्रमुख विलासभाई हल्याळी, नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश शिवाजी मुरकुटे, नेसरी उपशहर प्रमुख दिगंबर तेजम, रणजित देसाई, आशिष नांदवडेकर,प्रदून्य कांबळे, चिन्मय शिंदे,दिपक कदम, मंथन देऊसकर, विवेक कांबळे, रोहन रेडेकर, संग्राम पाळेकर ,ओंकार लष्करे आदी उपस्थित होते.