ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
आयुष्य प्रकाशमान करणारी वाचन संस्कृती जपायला हवी : प्रा. राहुल चित्रकार

कडगाव प्रतिनिधी :
‘वाचनातून वाचते’ होण्याची किमया ज्याने आत्मसात केली त्याला जीवनात यशस्वी होत आले, यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करावे, असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राध्यापक राहुल चित्रकार यांनी केले. सौ कारमेलिन हायस्कूल, तांबाळे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्राध्यापक राहुल चित्रकार यांनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किशोर मासिकाचे शंभर अंकांचे मोफत वितरण केले.
यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, गारगोटी हायस्कूल, गारगोटीचे ज्येष्ठ शिक्षक डॉ. आर. डी. पोवार, विजय देसाई, सर्जेराव हळदकर, महेश पोवार उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले.