मुदाळचा रविंद्र शिवाजी पाटील राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून पोलीस उपानिरीक्षक पदी लक्षणीय निवड; मुदाळचा पहिला पोलीस उपानिरीक्षक

भुदरगड प्रतिनिधी : प्रकाश पाटील
मनी धरलेला ध्यास माणसाला प्रयत्नातून यशापर्यत पोहचविल्या राहत नाही.हाच एक ध्यास घेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थीत अभ्यासाशी सामना करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत श्री रविंद्र शिवाजी पाटील याने पोलीस उपानिरीक्षक पदावर आपली मोहर उठवून लक्षणीय यश संपादन केले. अभ्यासाशी नाते जोडलेल्या रविने आपल्या मनाशी यशाची खूणगाठ बांधून दिवसाकाठी सलग आठ तास अध्ययनावर जोर देत अभ्यास केला. सातत्याने संदर्भ बुकावर लक्ष ठेवून परीक्षेचे स्वरुप आत्मसात केले होते.
आज त्याचे मुदाळात आगमन होताच सवाद्य मिरवणूक काढणेत आली. फटाक्याची आतषबाजी करणेत आली. यावेळी जिल्हा बँक व गोकूळ संचालक रणजितसिंह पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी मुदाळ च्या कर्मभूमीत या मातीतला व माझ्या संकुलातला एक सामान्य ,होतकरु विद्यार्थी पी.एस.आय. झाला हा मुदाळचा सन्मान असून रवि पाटील याचा आदर्श सर्वानी घ्यावा असे गौरवउदगार रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बाळूमामा शिक्षण संकूलाचे सेक्रेटरी विकासराव पाटील ( भैया) एम.एस.पाटील,यासह युवक वर्ग मोठया प्रमाणात हजर होता.रवि पाटील यांचे यशाबद्दल त्यांचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.