गडहिंग्लजमध्ये रंगला गुरुजींच्या क्रिकेटचा थरार ; राजर्षी शाहू चषक क्रिकेट स्पर्धा २०२१ – आजरा चँपियन तर भुदरगड उपविजेता

गडहिंग्लज: पुंडलिक सुतार
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा गडहिंग्लज आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राजर्षी शाहू चषक क्रिकेट स्पर्धा २०२१ या गडहिंग्लज येथील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या शिवराज काॅलेजच्या भव्य क्रीडा संकुलावरती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एकूण १७ संघ सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरुपी हिरवळ फुलवणार्या गुरुजनांनी प्रत्येक सामन्यागणिक अत्यंत चुरस, ईर्षा, रोमांच व उत्कंठा वाढवली. आणि शिवराजच्या हिरवळीवर क्रिकेटचा थरारक अनुभव घेतला.
साखळी सामन्यातील हातकणंगले संघाने ८ षटकांत चौकार व षटकारांची आतषबाजी करुन ११७ धावांपर्यंत मजल मारुन खळबळ उडवून दिली. तर शिरोळ व करवीर या दोन संघांनी १०९ धावांचा डोंगर उभारुन सामना टाय केला. उभय संघामध्ये झालेल्या सुपर ओव्हरमध्ये करवीरच्या संघाने शिरोळच्या संघाला अक्षरशः झोडपून काढले. पण त्यांना अंतिम सामना गाठता आला नाही.
या स्पर्धेत अनपेक्षित निकाल लागले. स्पर्धेचे आयोजक सरसेनापती गडहिंग्लजच्या संघाला चौथ्या स्थानावर तर तरुणांचा भरणा असलेल्या चंदगडच्या संघाला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचा अंतिम फायनलचा सामना आजरा विरुद्ध भुदरगड यांच्यात रंगला. गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष मा. महेश कोरीसाो यांनी नाणेफेक केल्यानंतर आजरा संघाने भुदरगडची गोलंदाजी फोडून काढली. चौकार, षटकारांचे फटाके फोडून ८ षटकात ९० धावांचे आव्हान दिले. ते पार करताना भुदरगड संघाची दमछाक झाली. पण शेवटी आजरा संघाने १९ धावांनी शानदार विजेतेपद पटकाविले. आणि २०१९ च्या मौनी चषक गारगोटीची पुनरावृत्ती झाली. सुंदर क्षेत्ररक्षण, धुवाँधार फलंदाजी, अप्रतिम व अचूक गोलंदाजी या अष्टपैलू कामगिरीवर आजरा संघ राजर्षी शाहू चषक २०२१ चा चँपियन बनला.
या स्पर्धेसाठीची बक्षिसे पुढील मान्यवरांकडून प्राप्त झाली.
प्रथम क्रमांक-
*रु. ११,०००/- व चषक JSW सिमेंट गडहिंग्लज.
द्वितीय क्रमांक-
रु. ८,०००/- व चषक युनिक आँटोमोबाईल गडहिंग्लज.
तृतिय क्रमांक-
*रु. ५,०००/- व चषक स्वराज एच. पी. गॅस एजन्सी गडहिंग्लज.
चतुर्थ क्रमांक-
रु. ३,०००/- व चषक मेगा बचत बझार गडहिंग्लज.
मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट कर्णधार, उत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्व सामनावीर ही सर्व पारितोषिके महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना गडहिंग्लज यांचे वतीने देण्यात आली.
स्पर्धेसाठीची सर्व सन्मानचिन्हे बाळासाो कालकुंद्रीकर, सौ. कल्पना मधुकर येसणे, विठ्ठल शंकर साळोखे, अनिल कुराडे, सौ. स्नेहलता पाटील यांच्याकडून प्राप्त झाली. तर पाणी व्यवस्था – सुरेश गुरव, चहापान व्यवस्था – उज्ज्वल कुंभार, मंडप व डेकोरेशन व्यवस्था – शिक्षक संघ महिला आघाडी गडहिंग्लज, प्रथमोपचार किट – गणेश मेडिकल गडहिंग्लज, खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था – विजय कुंभार, नंदकुमार येसादे, श्रीकांत कल्लोळे, डाॅ. किरण खोराटे व अमोल गुरव यांनी केली.
या संपूर्ण स्पर्धेसाठी *प्राथ. शिक्षक क्रिकेट टिम गडहिंग्लज, डी. एस. खामकर, विनायक पोवार, नंदकुमार वाईंगडे, सुर्यकांत चौगुले, दिलीप ब. पाटील, अर्पणा मुजुमदार, डाॅ.गणपत पाथरवट, शामराव टकेकर, बाबूराव गुरव, महानंदा मनगुळे, संजिवनी भोसले, सुरेश हुली, विष्णू कुराडे, संदीप कदम, संभाजी पाटील, पांडूरंग कापसे, बी. एस. कांबळे, सखरु भोसले, मालूताई जाधव, मधुकर जांभळे, विठ्ठल कदम, बाळासाो वालीकर, आप्पा देवरकर, भारती पाटील, सुजाता बिल्ले या मान्यवर गुरुजनांनी देणगी स्वरूपात मदत केली.
तसेच शिक्षक नेते मधुकर येसणे, नेते डी. एस. खामकर, दत्ता गोरे (आचारी) साऊंड व मंडप लिंगनूर, शिवराज काॅलेज परिवार,नगरपालिका गडहिंग्लज, संदीप माद्याळकर, मिलिंद कोरी व परिवार, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व क्रिकेट प्रेमी गडहिंग्लज यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व सामन्यांसाठी सचिन पाटील, राकेश चिलमी व यासीन मुल्ला यांनी पंच म्हणून काम पाहिले. दिनकर खवरे सर, राजगोळकर सर यांनी समालोचकाचे काम केले. व आँनलाईन लाईव्ह स्कोर सर्व जिल्ह्याला सुनिल कांबळे सर यांनी पोचवले.
या संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणार्या खालील खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
१) मालिकावीर – प्रशांत पाटील (आजरा)
२) उत्कृष्ट गोलंदाज – सत्यवान सोन्ने (आजरा)
३) उत्कृष्ट झेल – शिवाजी कोंडुसकर (गडहिंग्लज)
४) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – गुरुदेव साबळे (गडहिंग्लज)
५) उत्कृष्ट यष्टीरक्षक – संजीव नाईक (आजरा)
६) उत्कृष्ट कर्णधार – चेतन डवरी (भुदरगड)
७) उत्कृष्ट फलंदाज – बी. एस. कांबळे (गडहिंग्लज)
या स्पर्धे दरम्यान *गडहिंग्लज पं. स. सभापती, उपसभापती, पं. स. सदस्य, गडहिंग्लजचे गटशिक्षणाधिकारी, सर्व बक्षिसांचे प्रायोजक परिवार, जिल्ह्यातील विविध संघटनांचे अध्यक्ष, सरचिटणीस व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिवराज परिवाराचे पदाधिकारी, प्राथ. शिक्षक संघ महिला आघाडी, पी. सी. पाटील पतसंस्था गडहिंग्लजचे संचालक मंडळ, जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे संचालक, शिक्षक बँकेचे आजी माजी संचालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी स्पर्धेच्या ठिकाणी भेटी देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले.
स्पर्धेचे सुंदर व नीटनेटके नियोजन व आयोजन तसेच सर्व प्रकारच्या लागणार्या सुविधा उपलब्ध करुन स्पर्धा शांततेत व वेळेत पार पाडून सर्व जिल्ह्याला आदर्शवत कामगिरी करणार्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ उपशाखा गडहिंग्लजकरांचे संपूर्ण जिल्हाभर कौतुक केले जात आहे.
शेवटी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विजेते, उपविजेते व इतर खेळाडूंना विविध पुरस्कारांनी सन्मानित करुन या अविस्मरणिय स्पर्धेची सांगता करण्यात आली.