ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यात विघ्न नको म्हणून राणा दांपत्याची माघार ; ‘मातोश्री’ समोरील हनुमान चालीसा पठण आंदोलन मागे

मुंबई ऑनलाईन :

राणा दांपत्याने मुंबईतील आंदोलन मागे घेतले आहे. आज (दि. २३) दुपारी आमदार रवी राणा यांनी ही मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यात विघ्न नको म्हणून मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आंदोलन मागे घेत आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुणाच्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही : रवी राणा…..

कुणाच्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही. पंतप्रधान मोदी यांचा दौरा असून यादरम्यान कसलेही गालबोट लागू नये, यासाठी आम्ही आंदोनल मागे घेत आहे. हमुमान चालिसासाठी आमचा आग्रह होता. आम्ही दबावाला बळी पडणार नाही. हनुमान चालिसाला विरोध करणाऱ्यांना येणा-या कळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही रवी राणा यांनी यावेळी दिला.

शिवसैनिक नव्हे हे तर गुंड……

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध केला. मात्र, आमच्या घरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी हल्ला केला. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक नसून ते गुंड आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

वरुण सरदेसाई यांची राणा दांपत्यावर टीका……

दरम्यान, मुंबईत येवून मातोश्रीला आव्हान देण्याची कोणाची हिमंत नाही. मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती जन्माला आलेली नाही आणि कधी येऊ शकेल. राणा दांपत्यांनी तीन दिवस नौटंकी केली. आम्हाला आव्हान देण्याची हिंमत कुणाची नाही. पंतप्रधानांच्या दौ-याचे कारण देऊन त्यांना मुंबईतून पळ काढावा लागला. शिवसेनेच्या ताकदीचे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दर्शन झाले आहे, असा टोला शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी नवनित आणि रवी राणा या दांपत्याला लगावला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks