निसर्गमित्र मुरगूड च्या वतीने २५० झाडांना रक्षाबंधन ; उपक्रमाचे हे २३ वे वर्ष

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील शहर निसर्ग मित्र मंडळ आणि महिला निसर्ग मंडळ यांचेवतिने २५० झाडांना राख्या बांधून अनोखा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. उपक्रमाचे हे २३ वे वर्ष आहे.
वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली १९९७ पासून वनश्री रोपवाटिकेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ मुरगूड परिसरामध्ये सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून लोक प्रबोधना साठी आपल्या उपकारकर्त्या वृक्षबंधूंना राख्या बांधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या परंपरेची सुरूवात २००३ साली मुरगूड मधून झाली. आजही हा उपक्रम २३ व्या वर्षी सातत्यपूर्ण सुरू ठेवण्यात आला आहे.
मुरगूड येथील सरपिराजी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या समोरील मोठ्या वृक्षास सौ रेखा खोपडे व सौ सुरेखा हावळ यांच्या हस्ते मोठी प्रतीकात्मक राखी बांधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महिला निसर्ग मंडळाच्या अध्यक्षा सौ नीता सुर्यवंशी, उपाध्यक्षा आक्काताई मोहिते, नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी,अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्या सुवर्णा सायेकर, वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी, नगरसेवक दीपक शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यानंतर सरपिराजी रोड, नवी बाजारपेठ आणि महालक्ष्मीनगर येथील २५० वृक्षांना राख्या बांधून औक्षण करण्यात आले.
या उपक्रमामध्ये कल्पना मोहिते, स्नेहा चव्हाण, वैशाली सुर्यवंशी, श्रुती कमळकर,सरिता मांगले,शोभा देवडकर, साक्षी सुर्यवंशी,शांताबाई इंदलकर,पार्वती मांगले, वनश्री सुर्यवंशी, सुनिता रसाळ,सुजाता परीट, अनिता शिंदे, वंदना वाडेकर,राजश्री कुडवे, मंगल नलवडे,नीता पोवार,सोनाबाई परीट, उज्वला शिंदे, वैशाली शिंदे, ललिता यरनाळकर,नीता हावळ आदी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी तुकाराम शिंदे, युवराज मोरबाळे, मृत्युंजय सुर्यवंशी, बाळासो हळदकर, सिद्धेश सुर्यवंशी,संकेत वाडेकर,सुमीत परीट,सिद्धांत रसाळ उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी तर आभार ओंकार सायेकर यांनी मानले.