Rajya Sabha Election: धनंजय महाडिकांनी अखेर मैदान मारलं; वडिलांच्या विजयानंतर मुलगा भावूक

मुंबई :
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील (Rajya Sabha Election) सहा जागांवर एकूण सात उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे ही निडणूक अतिशय अटीतटीची झाली. या निवडणुकीत भाजपने आक्षेप घेतल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलं. त्यानंतर तब्बल 9 तासांनंतर पहिला निकाल हाती आला. या निवडणुकीत भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कोल्हापूरमधून धनंजय महाडिकच हे कोल्हापूरचे पैलवान ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांना धोबीपछाड दिला. या विजयानंतर भाजपने जोरदार जल्लोष केला. त्याच दरम्यान विधानभवन परिसरात अत्यंत भावूक असा क्षण पहायला मिळाला. धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यावर त्यांच्या मुलाने धावत येत गळाभेट घेतली.
भाजपचे संख्याबळ 122 इतकी होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे.
भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता. त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते अनिल बोंडे आणि 48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. 27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात 3 मतं बविआने महाडिक यांना दिली. एक मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.