ग्रामीण रुग्णालय व नगरपालिकेस राजे समरजितसिंह घाटगेंची भेट ; मुरगुड येथे 50 खाटांचे जिल्हा श्रेणीचे रुग्णालय व्हावे : नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शहरामध्ये पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामीण रुग्णालय व नगरपालिकेस भेट दिली.
प्रशासक अजित पाटील व वैद्यकीय अधिकारी पल्लवी तारळेकर यांच्याशी त्यांनी शहरात उद्भवलेली डेंग्यूची साथ, प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजना,रुग्णांची सद्यस्थिती व साथ आटोक्यात आणण्यासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर चर्चा केली. आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांशी संवाद साधून त्यांना आधार दिला.
मुरगूड व परिसरातील ग्रामस्थांनी 50 खाटांचे जिल्हा श्रेणीचे रुग्णालय व्हावे.अशी निवेदनाद्वारे मागणी केली. दरम्यान श्री,घाटगे यांनी आर. पी .साठे यांच्या खाजगी दवाखान्यात भेट दिली.डाॕ साठे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी शाहू कृषीचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस,बिद्रीचे माजी संचालक दत्तामामा खराडे, विलास गुरव, दगडू शेणवी,संजय पाटील ,विजय राजिगरे, अमर चौगुले,सुशांत मांगोरे, अमर चौगले,अनिल अर्जुने, सदाशिव गोधडे, विजय गोधडे, संग्राम साळुंखे युवराज कांबळे,राहुल खराडे,मयूर नाकोळे ,सुनील कांबळे ,नाना डवरी यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.