राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस सर्वसामान्यांच्या भाऊगर्दीत अमाप उत्साहत साजरा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस सर्वसामान्यांच्या भाऊगर्दीत अमाप उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित होते. नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी तरुणांची व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .वह्यांच्या स्वरूपात त्यांनी या शुभेच्छा स्वीकारल्या.
त्याआधी सकाळी हार्दायन श्री दत्त देवस्थान मठ, श्रीक्षेत्र आडीचे परमाब्धीकार प.पू. परमात्माराज तथा राजीवजी महाराज आणि सिद्द संस्थान मठ, श्रीक्षेत्र निडसोशी, निडसोशी (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) चे श्री म.नि प्रनव स्वरूपी पंचम जगद्गुरु श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले.
शाहू ग्रुप अंतर्गत श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना,राजे बँक,शाहू कृषी संघ, शाहू दूध संघ, राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार के.पी.पाटील,जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पंचायत समिती सदस्य अशोक पाटील,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,मलकापूरचे उपनगराध्यक्ष राजू प्रभाळकर,हिंदकेसरी पैलवान दीनानाथसिंह, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई,माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, नंदकुमार सूर्यवंशी,मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष वाय.व्ही. पाटील, अनिल डाळ्या, डॉ सतीश घाळी, पुढारीचे जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, कृष्णात चौगुले,सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, जाहिरात व्यवस्थापक आनंद शेळके, नंदकुमार दिवटे, तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक आनंद साजणे आदी मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे.
यांनी दिल्या फोनवरून शुभेच्छा
राजे समरजितसिंह घाटगे यांना खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आमदार प्रकाश आबिटकर आमदार प्रकाश आवाडे माजी खासदार राजू शेट्टी पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव जिल्हा परिषदेचे सदस्य व गोकुळचे संचालक अमरसिंह घाटगे आदींनी मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या.