ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजे फौंडेशनची ई लर्निंग सुविधा आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल : सौ.नवोदिता घाटगे ; राजे फाउंडेशन मार्फत शाळेत ई – लर्निंगचा लोकार्पण सोहळा.

म्हाकवे, प्रतिनिधी.

राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीची ई लर्निंग सुविधा आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.

राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांत ई- लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाअंतर्गत आणुर ता. कागल येथील प्राथमिक शाळेतील ई-लर्निंग सुविधा लोकार्पणवेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रेखाताई तोडकर,
यावेळी देशभुषण पाटील,आदर्श रानडे, श्रावणी कुंभार,यशराज जाधव,संचिता कोईगडे या गुणवंत विद्यार्थ्यांंचा,मार्गदर्शक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक ,संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांचा सत्कार केला.

सौ.नवोदिता घाटगे पूढे म्हणाल्या,शालेय अभ्यासक्रमासोबत ई लर्निंग सुविधा शिक्षण प्रणालीत अत्यावश्यक झाली आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.अपुऱ्या शैक्षणिक सुविधा असतानाही शिक्षक चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मेहनत करतात .त्यामुळे कागल तालुक्याचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे . शैक्षणिकदृष्ट्या आदर्श कागल घडविण्यासाठी व शैक्षणिकदृष्ट्या अग्रस्थानी येण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. राजे फाउंडेशनच्या या ई-लर्निंग सुविधेमुळे जागतिक पातळीवरील शैक्षणिक क्षेत्रातील अद्यावत घडामोडी शाळेतील विद्यार्थ्यांना अनुभवता येतील. असेही त्या म्हणाल्या .

यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील,माजी सरपंच शोभा कांबळे,शाळा समिती अध्यक्ष बाबासो कोईगडे,बी.जी. कांबळे, यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपिठावर मंडलिक साखर कारखान्याच्या संचालिका सौ.राजश्री चौगुले,’शाहू’चे संचालक डी.एस.पाटील, सचिन मगदूम,रुपाली खोत,मुख्याध्यापक एम.टी.चौगुले,श्रीपती खोत, रमेश कांबळे,दशरथ भोसले,प्रकाश माने,कृष्णात लोहार,भाऊसो लोकरे,संभाजी माने,के.बी.चौगुले, सुभाष देवडकर,पुंडलिक सावडकर यांच्यासह ग्रामस्थ,शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

स्वागत शशिकांत कुंभार यांनी केले.आभार सावंता देवडकर यांनी मानले.

लाखमोलाचे कार्य

राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीतर्फे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व सौ.नवोदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ई लर्निंग सुविधा ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना दिली जात आहे.या शाळांत सर्वसामान्यांची मुले शिकतात.त्यांची होणारी गैरसोय दूर होत आहे.त्यामुळे त्यांचे हे कार्य लाखमोलाचे आहे.असे गौरवोद्गार बी.जी. कांबळे यांनी काढले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks