पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत राजे बँक सेवा पुरविणार :समरजितसिंह घाटगे १००हूनअधिक कंपन्यांशी समन्वय करार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या मागणीनुसार राजे बँक सुविधा पुरविणार आहे.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील कार्यालयात उद्योजकांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी १००हून अधिक कंपन्यांशी राजे बँकेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत समन्वय करार झाले.
यावेळी श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास भारतातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा देश पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.घाटगे यांचा मॅकचे अध्यक्ष गोरख माळी यांच्या हस्ते सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले, शाहू ग्रुप, राजे फाउंडेशन, राजे बँक अशा विविध माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. छोट्या व्यावसायिकांना मोठ्या बँका कर्जासह इतर सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. मोठ्या ग्राहकांना ते पायघड्या घालतात .बहुजन समाजाला व्यवसायाला हातभार लावण्यास शाहू ग्रूप नेहमीच तत्पर आहे .शाहू ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना उद्योगासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण,अर्थसहाय्य व शासनाच्या सवलतीचे योजना एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही ते म्हणाले.
मॅकचे अध्यक्ष गोरख माळी म्हणाले, शाहू ग्रूप व राजे बँकेचे सेवा केंद्र सुरू केल्यामुळे उद्योजकांसह कर्मचाऱ्यांनाही सुविधा मिळण्यास उपयोग होणार आहे.
यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी राजे बँकेच्या विविध कर्ज योजनांची व उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत उपाध्यक्ष संजय पेंडसे, मोहन कुशिरे, संजय जोशी, सुरेश शिरसागर, हरिश्चंद्र धोत्रे,शंतनू गायकवाड सहभागी झाले.
यावेळी यशवंत पाटील, विठ्ठल पाटील ,अमृतराव यादव, कुमार पाटील, भावेश पाटील,गजानन कडूकर,संजय जाधव, प्रकाश काळे,प्रकाश तारदाळे, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते