ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पावसाचे पाणी वाढत आहे तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कालपासून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सह काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. कोल्हापुरातील रामानंद नगर परिसरामध्ये ओढ्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलेआहे. आज सकाळपासूनच या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. परंतु, खूप विनंती करून सुद्धा अजूनही काही नागरिक घराबाहेर पडत नाहीत. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, अजून दोन दिवस पाऊस आहे, त्यामुळे पाणी वाढण्याची वाट न पाहता प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी परिसरातील लोकांना केले आहे.