आरोग्यजीवनमंत्रताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज.

NIKAL WEB TEAM :
मॉन्सूनच्या हंगामात यंदा राज्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या तुलनेत २४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. १ जून ते ३१ जुलैपर्यंत सरासरी ५३८.५, ऐवजी ६६९.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. आता उर्वरीत हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याचा अंदाज
■ ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के, तर ऑगस्ट- सप्टेंबर (एकत्रित) सरासरीच्या ९५ ते १०५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील असं हवामान विभागाने म्हटलं आहे.राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची १ जून ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
■ परंतु, मध्य महाराष्ट्राच्या नंदूरबार आणि धुळे येथे पावसाने ओढ दिली. धुळे येथे सरासरीपेक्षा २३ टक्के, तर नंदूरबार येथे ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या उलट साताऱ्यात सरासरीपेक्षा ७० टक्के, तर परभणीत ७१ टक्के जास्त पाऊस नोंद झाली आहे.