साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज यांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार
साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने यावर्षी शाहु स्मारक सभागृह दसरा चौक कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दि 3 जानेवारी 2024 रोजी अतिशय धुमधडाक्यात व उत्साहपूर्ण वातावरणात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2023 पार पडला.
ज्यांचं कर्तृत्व आकाशापेक्षा मोठं ,ज्यांचं मातृत्व शब्दांच्या पलीकडले व ज्यांच दातृत्व महासागरा सारखे आहे,अशा विशाल अंतकरणाची व निरपेक्ष वृत्तीच्या तळागाळातील गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलचा उद्देश म्हणजे या गुणवंतांचे विविध क्षेत्रातील योगदान ओळखणे व ते अखंड ठेवणे .हा पुरस्कार अशा गुणवंतांना दिला जातो जे समाजासाठी एक प्रेरणा स्त्रोत व आदर्शवत ठरत आहेत ज्यांनी आपली योग्यता आणि मेहनतीच्या जोरावर आपले समाजातील स्थान बळकट करत आपण समाजाचे काही देणे लागतो या तत्त्वावर कार्य केले आहे .अशा सर्व गुणवंतांचा योग्य तो उचित सन्मान होण्यासाठी व त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी समाजाला प्रवृत्त करण्याचा व समाजासाठी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो.
यावर्षी शाहु स्मारक सभागृह कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व नागरिकांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव , प्रमुख अतिथी मराठी अभिनेत्री आदिती देवर्षी, प्रमुख उपस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर जिल्हा पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे,गृह पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर जिल्हा प्रिया पाटील, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सातारा पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, दुर्वास सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील, उद्योजक शिवाजीराव सुतार, मंदार परितकर ,बी.एस पाटील यासह मान्यवर व पत्रकार किरण मस्कर , महेश पाटील, अमोल गावडे,संभाजी सुतार , प्रकाश मेंगाणे, उत्तम पाटील उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन मुख्य संपादक अनिल सुतार यांनी केले होते . सुत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले होते.