खोटे गुन्हे मागे न घेतल्यास राहूल देसाई यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

गारगोटी प्रतिनिधी :
चुकीच्या पध्दतीने खोटे गुन्हे नोंद करून घेत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा भाजपचे नेते राहूल देसाई यांनी या गुन्हे नोंद घटनेनंतर आपल्या गारगोटी येथील कार्यालयात प्रतिक्रिया देताना सांगितले.
ते पूढे म्हणाले की, मेघोलीच्या दुर्घटनाग्रस्त लोकांच्यासाठी आंम्ही सर्वपक्षीय आंदोलन सुरु केले आहे. आमचा हा मोर्चा सर्वपक्षीय आहे तर मग या आक्रोश मोर्चात आबिटकर गट का आला नाही? उलट हे आंदोलन दडपशाही करून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे प्रकार यापूढे आम्ही खपवून घेणार नाही. आमदारकी आमच्याही घरात गेले १५ वर्षे होती.आंम्ही राजकारणातून सत्तेची मस्ती कधी केली नाही. आता खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत तर आंदोलन तीव्र करणार आहोत.
आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने झालेला वाद मिटवायला आलेल्या पोलीस पदाधिकाऱ्यांसमोर राहूल देसाई समर्थकांनी आपली भुमिका आक्रमकपणे मांडली होती. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते उपस्थीत होते.राहूल देसाई पूढे म्हणाले की,दडपशाहीने आंम्ही दडपले जाणार नाही. सर्वपक्षीय लोकांना सोबत घेवूनच आंम्ही मेघोलीच्या दुर्घटनाग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी उभा केलेला हा सर्वपक्षीय लढा शेवटच्या माणसाला न्याय मिळेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे राहूल यांनी सांगितले.
या बैठकीवेळी तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रा बाळ देसाई, मौनी विद्यापीठाचे विश्वस्थ मधुकर देसाई आप्पा, भाजपचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील, प्रविणसिंह सावंत, मनसेचे नेते युवराज येडूरे, गारगोटी चे सरपंच संदेश भोपळे, अलकेश कांदळकर, शरद मोरे, विजय आबिटकर, भाजपचे तालुका सरचिटणीस अनिल तळकर, प्रकाश वास्कर, मच्छिंद्र मुगडे, अमित देसाई, संग्रामसिंह पोपळे, शिवराज देसाई हे उपस्थीत होते तर आजच्या प्रतिक्रिया वेळी तालुका शेतकरी संघाचे उपाध्यक्ष एम डी पाटील, सदाशिव देवर्डेकर, एम एम कांबळे, अनिल तळकर, गारगोटीचे उपसरपंच राहूल कांबळे आदि उपस्थीत होते.