गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधानगरी : भाच्याचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मामाचा खुन

राधानगरी प्रतिनिधी :

धामोड व बुरंबाळी ता.राधानगरी दरम्यानच्या हॉटेल निसर्गमध्ये जेवल्यानंतर तंबाखु खाण्यासाठी चुना मागण्यावरून विकास नाथाजी कुंभार रा. कुंभारवाडी याची व जितेंद्र केरबा खामकर रा. खामकरवाडी या दोघांची हॉटेलमध्ये वादावादी झाली.

हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने धामोड येथिल मामा अनिल रामचंद्र बारड यांना बोलावुन घेतले व रात्री ११ वाजता ते दोघेजण कुंभारवाडी ता. राधानगरी येथे गेले असता आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकुने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. पाठीत व खांद्याच्या खाली वर्मी वार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. मारेकरी विकास कुंभार याला राधानगरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून आधिक तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह कोळी हे करत आहेत. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणुन काम करत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks