ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राधानगरी : विद्युत वाहिणीला स्पर्शाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा मृत्यू

राधानगरी प्रतिनिधी :
भोपळवाडी येथील एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा विद्युत वाहिणीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. सुभाष लक्ष्मण शेलार (वय ४२) असे चालकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुभाष शेलार हे कर्नाटक राज्यातील हुबळी-धारवाड परिसरातून ट्रकने ऊसाची वाहतूक करतात. आज ट्रकचा विद्युत वाहिणीला स्पर्श झाल्याने विजेचा प्रवाह ट्रकमध्ये उतरून शॉक लागून सुभाष जागीच ठार झाले. सुभाष हे स्वतःच्या मालकीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होते. कष्टाळू सुभाषच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.