राधानगरी : राशिवडे गावची दुरावस्था; गावच्या प्रवेशद्वाराजवळ गटाराचे पाणी; प्रशासनाचे दुर्लक्ष

राधानगरी प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे या गावात येणाऱ्या प्रवासाचे स्वागत हे गटारीच्या पाण्याने होते .
राशिवडे बुद्रुक येथील राज्यमार्ग 189 परिते , राशिवडे ते म्हासुरली या रोडवर राशिवडे बुद्रुक येथील रेणुका मंदिर येथे चक्क गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्या निसरटीचा बनलेला आहे . त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . काही प्रवासी , शेतातून जनावरांना चारा घेऊन येणारे शेतकरी , महिला , या रस्त्यावरून जात असताना सदर रस्त्यावर पाण्यामुळे शेवाळ झालेले असून अनेक लोक पाय घसरून पडलेले आहेत. तर गाड्या ही या शेवाळा वरून पडत आहेत तरीही याकडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष आहे.
“रोगापेक्षा इलाजचं भयंकर झाला आहे.”
ग्रामपंचायतीने तहसीलदारांना बोलून घेऊन तात्काळ हा पाण्याचा मार्ग सुरु करावा. अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत . यासाठी तहसीलदारांना वारंवार सूचना देऊनही तहसीलदारांना सवडचं नाही . एखाद्या ग्रामस्थांचा पाय घसरून जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत