राधानगरी : बरगेवाडी ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करा ; माजी उपसरपंच मयुरी बरगे यांची जिल्हाधिकार्यांच्याकडे मागणी

कौलव प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चा संसर्ग कमी झाल्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँक, महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच सहकारी संस्थेचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे तसेच राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील 4 हजार554 ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 194 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे
या पोटनिवडणुकी बरोबरच राधानगरी तालुक्यातील गेले आठ महिने रिक्त असलेल्या बरगेवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी बरगेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच मयुरी संदीप बरगे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे
राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी ग्रामपंचायतीचा सदस्यांचा कार्यकाल 28 फेब्रुवारी 2021 रोजी संपला असून या ग्रामपंचायतीवर कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्यामार्फत प्रशासक यांची नियुक्ती करण्यात आली आहे
राज्य शासनाचा 14 वा तसेच 15 वा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत असल्यामुळे गावच्या विकास कामांना वेग आला आहे. हा निधी वेळेवर खर्च करण्यासाठी शासनाचे निकष ग्रामपंचायतीला लागू असतात त्यामुळे ग्रामपंचायतीवर गावातील पदाधिकारी असणे तितकेच गरजेचे आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी माजी उपसरपंच मयुरी बरगे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे