कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कुरुंदवाडचे एस. के. पाटील कॉलेज प्रथम तर मुरगूडचे मंडलिक महाविद्यालय द्वितीय

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवाजी विद्यापीठांतर्गत कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या चुरशीच्या लढतीत कुरुंदवाडच्या एस. के. पाटील कॉलेजने मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयास २ – १ सेटनी पराभूत करीत प्रथम क्रमांक पटकावला .मंडलिक महाविद्यालयास द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले .
देवचंद कॉलेज अर्जुननगरने तिसरा तर डी. आर. माने कॉलेज कागल संघांने चतुर्थ क्रमांक पटकावला . पहिले चार संघ वडूज ( जि -सातारा ) येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
मुरगूडात शिवाजी विद्यापीठांतर्गत, कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने शिवराज हायस्कूल व ज्युनिअरच्या व्हॉलीबॉल मैदानावर संपन्न झाल्या .या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील १६ वरिष्ठ महाविद्यालयाचे व्हॉलीबॉल संघ सहभागी झाले होते होते. प्रथम क्रमांकाच्या लढतीत कुरुंदवाडच्या एस. के. पाटील कॉलेजने मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयावर पहिल्या सेट मध्ये २५ – १६ असा जिंकत आघाडी घेतली . मात्र दुसरा सेट मंडलिक महाविद्यालयाने २५ – १६ असा जिंकत बरोबरी साधली .
अंतिम तिसऱ्या सेटमध्ये कुरुंदवाडच्या एस. के. पाटील कॉलेजने मंडलिक महाविद्यालयास १५ – १० असे रोखत प्रथम क्रमांक पटकावला . कुरुंदवाड संघाकडून ऋषी चव्हाण व प्रथमेश सरगूले या स्मॅशरनी धीरज पाटील च्या पासेसवर विजयश्री खेचून आणली . तर मुरगूड संघाकडून गजानन गोधडे , करण मांगले , सत्यजित शिंदे व विवेक चांगले यांनी कडवी झुंज दिली .
देवचंद महाविद्यालय अर्जूननगर संघाने डी आर माने महाविद्यालयास २५ – १५ , २४ – २६ व १५ – ८ अशा गुण फरकाने हरवीत तृतीय क्रमांक पटकावला . स्पर्धेत महेश शेडबाळे , प्रवीण मोरबाळे , भालचंद्र आजरेकर , दिपक चव्हाण , विनोद रणवरे , संजय पाटील , संग्राम तोडकर,अनिल देवडकर यांनी काम पाहिले . स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रावण कळांद्रे , अभी रामाणे व राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबने परिश्रम घेतले .
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासो थोरवत प्रा. एस. एन. आंगज , माजी प्राचार्य महादेव कानकेकर, प्रा सुनील चव्हाण , स्पर्धा सचिव प्रा. डॉ .शिवाजी पोवार ,उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे ,प्रा. सुहास वाघ, संभाजी मांगले यांच्या उपस्थितीत झाला . मंडलिक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व स्पर्धा सचिव प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी स्वागत, प्रा. पी. आर. फराकटे यांनी यांनी आभार मानले.