गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधानगरी : खामकरवाडीत पती व सासुवर आत्महत्येस प्रवृत्त केलेचा गुन्हा

राधानगरी प्रतिनिधी :

राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथिल सुरेखा संजय र्‍हायकर या नवविवाहितेच्या मृत्युप्रकरणी तिचा पती संजय राजाराम र्‍हायकर व सासू लक्ष्मी र्‍हायकर या दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील मृतकेचा पती व सासु तुला दोन मुलीच झाल्या आहेत, तुला घरकाम नीट जमत नाही, तु पांढर्‍या पायाची आहेस, तू आमच्या घराला वंशाचा दिवा देऊ शकत नाहीस असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक अत्याचार केलेने त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने 12/09/2021 रोजी विषारी औषध प्राशन केले. यामध्ये उपचारादरम्यान तिचा उपचारादरम्यान सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दि. 22/09/2021 रोजी मृत्यू झाला. याबाबत मृत सुरेखाची आई आंबुबाई सावत रा. सावतवाडी ता.राधानगरी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबतची फिर्याद दिल्याने राधानगरी पोलीसांत कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

यातील आरोपी पती संजय राजाराम -हायकर, राहणार खामकरवाडी हा पोलीसांना मिळुन येत नव्हता काल पहाटे दिनांक 10 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरिक्षक अनुराधा पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks