पुरोगामी संघर्ष परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर :
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.
निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये शिंदेवाडी (तालुका पन्हाळा) येथील रस्ता करावा,कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर ई वार्ड मध्ये अस्वच्छता असून तेथील सफाई ताबडतोब करावी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना प्रभावीपणे राबवावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा(भाई) मुल्ला ,कोल्हापूर शहर अध्यक्ष दिलीपराव कांबळे ,महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर ,कोल्हापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्षा राधा कांबळे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा पूजा बागडे, पन्हाळा तालुका अध्यक्ष सुनंदा शिंदे, कोल्हापूर संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, वनिता सोनावले, मेहक निशानदार, रंजना जाधव, मंगेश हेगडे, राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य अंकुश (मेजर) शिंदे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.