कागल तालुक्यातील बस्तवडे येथील पुलाच्या अपुऱ्या कामाबद्दल लक्ष वेधण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कगल तालुक्यातील बस्तवडे येथील असणाऱ्या पुलावरील अनेक अपुऱ्या कामाबाबत लक्ष वेधण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिग्विजय मांगोरे यांनी हे निवेदन स्वीकारले.त्यावेळी त्यांनी अपुरी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मुरगूड पोलीस स्टेशनकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, उप तालुका प्रमुख समिर देसाई उप तालुकाप्रमुख युवराज येजरे,वाहतूक सेना तालुकाप्रमुख नितीन डावरे,माजी तालुकाप्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख नितीन भोकरे,विभाग प्रमुख राजू साबळे,विभाग प्रमुख अमृत पाटणकर, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील,विभाग प्रमुख संदीप कांबळे,युवा सेना शहर प्रमुख विजय भोई,शंकर गंधुगडे,वैभव कांबळे, अमित पाटील,कापशी शहर प्रमुख चंदू सांगले, रामदास पाटील,शेतकरी संघटना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले,माजी सरपंच पांडू वांगळे, पिंटू पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जे एल पाटील, विघ्नेश खटांगळे, अमित भोई, अजित बोडके,प्रमोद अश्रू पाटील,पाटील,रणजीत हातकर, किरण मासुळे,लक्ष्मण माळी,नेताजी वायदंडे जिल्हाध्यक्ष ब्लक पॅंथर संघटना प्रमोद पाटील देवदुत यांचेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.