हिंदुत्ववादी संघटनेतर्फे पन्हाळा येथे हिंदवी स्वराज्याच्या ज्ञात-अज्ञात असणाऱ्या मावळ्यांना हिंदू धर्माप्रमाणे श्रद्धपुजा विधी संपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
हिंदू संस्कृतीनुसार भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पितृपक्षाला आनन्यसाधन महिन्यात महत्व आहे. आज पितृपंधरवड्यातील भाद्रपद चतुर्दशी यानिमित्ताने श्रद्ध्या क्रियते तत् श्रद्धम म्हणजे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. इतरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे, व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे.
भाद्रपद चतुर्थी शस्त्राघाताने वीरगती मिळालेल्या विर योद्ध्यांचे श्राद्धविधि संपूर्ण करण्याचा दिवस हिंदुत्ववादी संघटनेतर्फे आज पन्हाळा येथे वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळ भोवतालची पावसाने वाहून आलेली खर- माती वाढलेली झाडे झुडपे काढून पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली. आज आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने आपली पिढी वैभवसंपन्न आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे,हे ओघाने आलेच,या ऋणांची जाणीव ठेवून त्यातून उत्तराई होण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, शिवा काशिद, वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे,नेताजी पालकर, हिंदू धर्म टिकवण्यासाठी ज्या ज्ञात-अज्ञात सैनिकांनी तसेच मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यासाठी शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी आज शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांचा श्राद्ध विधी संपन्न करण्यात आला.
यावेळी वीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज श्री आनंदराव काशीद हे प्रामुख्याने उपस्थित होते.कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाचे सचिव श्री निलेश कुलकर्णी, स्वप्निल मुळे गुरुजी, प्रसाद निगुडकर, यांच्यामार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीने श्राद्ध विधी संपन्न करण्यात आला. समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे, सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सनी पेणकर, हिंदू एकता चे अनिल चोरगे, ऋषिकेश कोकितकर, विश्वकर्मा व्हटकर,विकास भोसले, राहुल पोळ, अविनाश पांढरे,शांताराम शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.