जागतिकताज्या बातम्याभारतराजकीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; कोरोनानंतर पहिलाच मोठा दौरा; राष्ट्राध्यक्ष बायडन यांचीही घेणार भेट.

NIKAL WEB TEAM :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (बुधवारी) अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी ११.०० वाजता अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. २६ सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांसोबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे.
पाच दिवसांच्या आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान क्वॉड समिट, कोविड ग्लोबल समिटमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात ते सहभागी होणार आहेत. करोना महामारीनंतर मोदींचा हा पहिलाच मोठा दौरा आहे. मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पदग्रहणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.