कागल तालुक्यातील सोनगेत नागपंचमी उत्सवाची जय्यत तयारी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कर्नाटक आणि महाराष्ट्र येथिल लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सोनगे (ता. कागल) येथील क्षत्रिय नागदेवता चौंडेश्र्वरी देवीची नागपंचमी यात्रा मंगळवार दि. 29 रोजी साजरी होत आहे. यात्रेदरम्यान भाविकांच्या सर्व सोयीसुविधांसाठी गावात जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सरपंच पांडुरंग कुंभार यांनी दिली.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपंचमी यात्रा विधिवत होणार असून पहाटे पाच वाजता प्रमुख मान्यवर आणि मानकरी श्री.गणपती गुरव यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा व काकड आरती तसेच इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात येईल.
या नागपंचमी यात्रेसाठी एसटी विभागाने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
नेहमी प्रमाणे एकेरी मार्गाची व्यवस्था तसेच सुस्सज पार्किंग व्यवस्था केली असुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला येणार आहे तसेच येणाऱ्या सर्व भविंकासाठी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करणेत आली आहे.