आरोग्यजीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकारात्मक वृत्त : कोल्हापुर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 80 हजार 750 डोस उपलब्ध

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे 80 हजार 750 डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यापैकी 2 हजार 800 लस या दिव्यांग आणि परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा तालुक्यासाठी 3 हजार, भुदरगड तालुक्यासाठी 3 हजार 330, चंदगड तालुक्यासाठी 4 हजार 690, गडहिंग्लज तालुक्यासाठी 5 हजार 870, गगनबावडा तालुक्यासाठी 780, हातकणंगले तालुक्यासाठी 15 हजार 840, कागल तालुक्यासाठी 4 हजार 480, करवीर तालुक्यासाठी 8 हजार 410, पन्हाळा तालुक्यासाठी 4 हजार 500, राधानगरी तालुक्यासाठी 4 हजार 790, शाहूवाडी तालुक्यासाठी 4 हजार 190 तर शिरोळ तालुक्यासाठी 7 हजार 220 डोस प्राप्त झाले आहेत.

सीपीआर रूग्णालयासाठी 550, सेवा रूग्णालय, कसबा बावडासाठी 800 तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 9 हजार 500 असे एकूण 77 हजार 950 डोस प्राप्त झाले आहेत. 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks