ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड येथे ईद व गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथे येत्या काही दिवसात ईद- ए-मिलाद, गणेश चतुर्थी या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राहावी, यासाठी शनिवारी मुरगूड पोलिसांनी संपूर्ण शहरातून सशस्त्र संचलन केले.
या संचलनात सपोनि शिवाजीराव करे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे शंभर पोलिस आणि होमगार्ड सहभागी झाले होते. संचलनाच्या अगोदर एसटी स्टँडच्या पटांगणामध्ये दंगल काबू प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.
पोलिस ठाण्यापासून तुकाराम चौक, हनुमान मंदिर, आंबाबाई मंदिर, एसटी स्टैंड तेथून जवाहर रोड आणि नंतर बाजारपेठ भागातून पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सूचना देत संचलन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे, सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. संचलनाकडे नागरिक कुतुहलाने पाहत होते.