ताज्या बातम्यामहाराष्ट्र
फडणवीसांना पोलीसांची नोटीस ! चौकशीसाठी हजर रहा ! फोन टॅपींग आणि अधिकारी बदल्या प्रकरण भोवणार !

मुंबई ऑनलाईन :
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली असल्याची माहिती स्वत: फडणवीस यांनी दिली आहे.
फोन टॅपींग आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या याबाबत सुरु असलेल्या तपासासंदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी बीकेसी सायबर पोलीस स्टेशन येथे उद्या ११ वाजता बोलावण्यात आले आहे.
आपण दिलेल्या वेळेत पोलीसांसमोर हजर राहणार असून आपला जबाब नोंदविणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हणले आहे.
मी एकेकाळी गृहमंत्री होतो, त्यामुळे माझी जबाबदारी मी जाणतो. मला मिळालेली माहिती उघड न करण्याची सवलत मला लोकप्रतिनिधी म्हणून आहे, परंतू मी त्याचा वापर करणार नाही. या चौकशीच्या माध्यमातूनच आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारला उघडे पाडणार आहोत, असे त्यांनी सांगितले.