ताज्या बातम्यामहाराष्ट्र
#Police #Army : बारा महिन्यात भरती न झाल्यास संपूर्ण फी परत; कोनवडे येथील राजर्षी शाहू करिअर प्रबोधनीचे मार्गदर्शक राजेंद्र गुरव यांची माहिती.

कूर प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील अनेक भागातील पोलीस-आर्मी मध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी कोनवडे(ता.भुदरगड) येथील राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कडून फी परत योजना सूरु करण्यात आली आहे.
बारा महिन्यात भरती न झाल्यास संपूर्ण फी परत योजना सुरू केल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी दिली.
या संस्थेवर युवक-युवती इतकाच त्यांच्या पालकांनीदेखील विश्वास दाखवल्यामुळे अनेक युवक-युवती पोलीस, आर्मी यांसह विविध पदांवर महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र गुरव यांनी सांगितले.
त्यामुळेच या फी परत योजनेचा लाभ सर्व होतकरू युवक-युवतींनी घ्यावा असे ते म्हणाले.
पात्रता :
शिक्षण : १२वी पास
उंची : मुले १६५ सें.मी. / मुली १५५ सें.मी.