ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजरा साखर कारखान्याच्या संचालकांनी पारदर्शी कारभारातून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवावा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा ऐतिहासिक विजय झाला. विजयाची सर्व श्रेय शेतकरी सभासदांचे आहे. नूतन संचालकांनी पारदर्शी कारभारातून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकरी सभासदांनी या आघाडीवर विश्वास ठेवल्यामुळेच एवढा मोठा ऐतिहासिक विजय झाला, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर देसाई होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आज-याचे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत या कारखान्याची उभारणी केली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटत असतानाच विरोधकांनी ही निवडणूक लादली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करीत हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलं.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांची सहकार चळवळ पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफच शकतात यावर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ झाला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, बिद्री साखर कारखाना आणि आता आजरा साखर कारखान्यातील हे यश त्याचेच द्योतक आहे.

केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटत असतानाच चुकीची माणसं आत घालण्याला आम्ही विरोध केला. त्यानंतर पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर सभासदांनी फार मोठा विश्वास व्यक्त केला.

माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी या निवडणुकीत आम्हाला हिंमत आणि ताकद दिली. नेता कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ. नागपूर अधिवेशनातून ते चारवेळा प्रचारासाठी आज-याला आले.

दिगंबर देसाई म्हणाले, विरोधी आघाडीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखाली मी १२ वर्षे काम केले आहे. अवघे साडेतीन कोटी या कारखान्याचे कर्ज राहिले होते. परंतु; त्यांच्या आडमुठेपणामुळे तो बोजा ७० कोटींवर गेला. त्यांच्या वाचाळ आणि उद्धटपणामुळेच या कारखान्याची वाताहात झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाटगे, बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, नेताजी मोरे, अस्लम मुजावर , संग्राम गुरव, अमित पिष्टे, वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे, दीपक देसाई, मुकुंद देसाई, सुभाषराव देसाई, शिवाजीराव नांदवडेकर, उदयसिंह पोवार, रणजीत देसाई, गोविंद पाटील, मधुकर देसाई, राजेश जोशीलकर, राजेंद्र मुरुक्टे, अनिल फडके, विष्णुपंत केसरकर, संभाजीराव पाटील, काशिनाथ तेली, हरिभाऊ कांबळे, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, नामदेवराव नार्वेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks