ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे खचणाऱ्या रस्त्यांसाठी कायम स्वरूपाची उपाय योजना आवश्यक : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

पावसाळ्यात घाट परिसरातील रस्ते आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने या मार्गावरुन जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागते. भविष्यात रस्ता खचणे, दरड कोसळणे यासारख्या घटनेमुळे वाहतूक बंद करावी लागू नये, यासाठी अतिवृष्टीमुळे खचणाऱ्या रस्त्यांसाठी कायम स्वरूपाची उपाय योजना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना घेऊन यावर कायमस्वरुपी उपाय योजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या.
भुईबावडा घाटात अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज कली. यावेळी त्यांच्या समवेत करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहासिलदार रामदास झलके, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कुलकर्णी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे घाटातील दरड कोसळण्याची घटना घडत आहे. घाट रस्ता देखील खचला आहे. यामुळे भुईबावडा घाटातून तळ कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद आहे. रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने, रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना करुन पालकमंत्री म्हणाले, घाट माथ्यावरून पाणी रस्त्यांवर येणार नाही, यासाठी पाण्याला वेगळी दिशा देणे गरजेचे आहे, यासाठी उपाययोजन कराव्यात. रस्ता खचू नये, यासाठी वेगळे नियोजन करण्याबाबही सूचना केल्या.

भुईबावडा घाटातील खचलेल्या रस्त्यांची पाहणी करून पालकमंत्री श्री. पाटील यांनी पंचायत समिती येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पालकमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे शेळोशी –धुंदवडे रस्त्यांवर झालेले भूस्खलन, भूस्खलनामुळे खचलेला आणदूर-धोंदवडे रस्ता, भूस्खलनामुळे मांडूकली गावठान येथे भातशेती, ऊस शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी गारिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचीही पाहणी केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks