कुमार भवन, शेणगाव प्रशालेमध्ये पेन्शनर्स डे उत्साहात साजरा

गारगोटी प्रतिनिधी :
श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी बी. एड्. अभ्यासक्रम अंतर्गत शालेय आंतरवासिता टप्पा-2 व कुमार भवन,शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक- १७-१२-२०२१ पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जीवन शिक्षण मंदिर,शेणगाव या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाटळे गुरुजी, इंजिनीअर क्षेत्रात सेवानिवृत्त व जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंदराव भोसले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त मॅनेंजर विश्वनाथ कुंभार, कर्मविर हिरे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्टार पंडित साळुंखे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.पी.एस्. देसाई होत्या.
प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाटळे गुरुजी यांनी कुटुंब आणि नोकरी याची माहिती देत, नोकरी करताना आलेला अनुभव व आता सेवानिवृत्तीनंतर चा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी चे सेवानिवृत्त रजिस्टार पंडित साळुंखे यांनी सेवानिवृत्त धारकांना उपलब्ध सेवा सुविधा पेन्शन घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात याबाबत आपले मत विशद केले.
अध्यक्ष मनोगतामध्ये प्रा. डॉ. पी. एस्. देसाई यांनी सेवानिवृत्त दिनाचा इतिहास व त्याची पार्श्वभूमी विशद करत सेवानिवृत्त धारकांनी आरोग्यसंपन्न रहावे. यासाठीचे मार्गदर्शन, विद्यार्थी मित्रांनी त्यांच्या घरी असलेल्या वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे किती महत्वाचे आहे. असे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम कुमार भवन, शेणगाव या शाळेचे मुख्याध्यापक प्रा. डॉ. एस. बी. शिंदे ,शालेय आंतरवासिता मार्गदर्शिका प्रा.डॉ. पी.एस. देसाई व शालेय आंतरवासिता छात्रशिक्षक व शिक्षिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र शिक्षिका वनिता मगदूम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून व भित्तीपत्रिका उद्घाटनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरवासिता मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान आरोग्यसंपन्न पुस्तक व फुल देऊन केले. कार्यक्रमाची सांगता शालेय आंतरवासिता छात्र शिक्षिका अश्विनी जेधे यांनी आभार मानून केले.