ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

गारगोटी एस.टी. संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न मनसेने उधळला; मनसे नेते युवराज येडूरे आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास मनसेचे नेते युवराज येडूरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

गारगोटी प्रतिनिधी : 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मोडित काढण्याचा डाव एसटी प्रशासनाकडून सुरू आहे. सोमवारी गारगोटी येथे संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांनी उधळून लावला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास मनसेचे नेते युवराज येडूरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात, कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी ते गेले असता, एसटी प्रशासनाकडून आगारातून काही बसेस बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र याला विरोध करत येडूरे यांनी निर्वाणीचा इशारा देत बसेस पुन्हा आगारात पाठवल्या. कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून होत असल्यामुळे सकाळपासून येडूरे गारगोटी एसटी बसस्थानकासमोर कर्मचाऱ्यांसह आंदोलनात सहभागी झाले. यावेळी प्रशासनाकडून काही कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले व बसेस आगाराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

युवराज येडूरे म्हणाले, एसटी प्रशासनाकडून कामगार संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. एसटीसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे हे राज्य सरकारसाठी लांच्छनास्पद आहे.

यावेळी संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांनी येडूरे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी भुदरगड तालुक्यातील एसटी कर्मचारी, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks