ताज्या बातम्या
गोडसाखरच्या सेवानिवृत्त कामगारांच्या देय रकमा द्या; निवेदनाद्वारे मागणी.

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याचे आज अखेर तिनशेहुन अधिक कामगार सेवानिवृत्त झाले आहेत त्यातिल साठहुन अधिक कामगार मयत आहेत तिसएक कामगार आजारी असून सेवानिवृत्तीनंतर तीस दिवसात फायनल पेमेंट व ग्रॅच्युईटी देण्याचा कायदा असुनदेखिल सेवानिवृत्त कामगारांना आजअखेर देय रक्कम मिळालेली नाही यावर तोडगा म्हणून कारखाना प्रशासन व कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलवावी अन्यथा 19 जुलैपासुन उपयविभागिय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा ईशारा सेवानिवृत्त साखर कामगार संघटनेने उपविभागिय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केलेला आहे यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव खोत, तारेवाडी गावचे युवा नेते संजय पांडुरंग पाटील, चंद्रकांत बंदी, रणजित देसाई, महादेव मांगले, बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.