१८ आक्टोंबर मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा : कॉ.भरमा कांबळे

प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने, बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडीक्लेम योजना तातडीने सुरू करावी तसेच बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला दहा हजार रुपये दिवाळी भेट द्या या व अन्य प्रलंबित मागण्याकरिता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर येथे सोमवार दि १८ आक्टोंबर २०२१ रोजी च्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ भरमा कांबळे यांनी केले. ते उत्तुर श्री लक्ष्मी मंदिर कार्यालय येथे बांधकाम कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉ प्रकाश कुंभार हे होते.
कॉ. भरमा कांबळे पुढे म्हणाले,कोविड, महापुर, वाळु उपसाबंदी, महागाई यामुळे बांधकाम कामगार मेटाकुटीला आला आहे. यातुन सावरण्यासाठी व कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी तातडीने येत्या दिवाळीसाठी बांधकाम कामगारांना दिवाळी भेट १० हजार रुपये दिले पाहीजेत. त्यासाठी आक्रमकपणे लढायची तयारी ठेवन्याचे आवाहनही कॉ कांबळे यांनी केले.
यावेळी जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम म्हणाले तत्कालीन भाजप सरकारने बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाल बावटा संघटनेने कॉंग्रेस आघाडीला सहकार्य केले परंतु या सरकारने सुद्धा बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष कॉ संदीप सुतार यांनी केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण घेऊन कामगारांना वेठबिगार करण्याचे धोरण अवलंबले आहे.त्याला सुद्धा सार्वत्रिक विरोध केला पाहीजे असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आजरा तालुका अध्यक्ष कॉ प्रकाश कुंभार यांनी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरील मोर्चामध्ये आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातुन किमान ७ हजार कामगार भागीदारी करेल असे अश्वासन दिले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम, आजरा तालुका अध्यक्ष कॉ प्रकाश कुंभार, राधानगरी तालुका अध्यक्ष कॉ संदीप सुतार, दत्ता कांबळे, शिवाजी कांबळे, अजित मगदूम, संजय चौगुले आदी उपस्थित होते. प्रास्तविक दत्ता कांबळे यांनी केले तर. आभार संजय चौगुले यांनी केले.
प्रमुख मागण्या
१)आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून कामगारांना रिपोर्ट न देणाऱ्या कंपणीचा ठेका रद्द करा व त्याबदल्यात बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा.
२) जोपर्यंत मेडिक्लेम योजना सुरू होणार नाही तोपर्यंत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जे उपचार करता येत नाही त्या उपचारासाठी मंडळाकडून खर्चाचा परतावा देण्यात यावा.
३) मागील प्रलंबित ₹ २०००+३००० चे कोविड अनुदान व चालूचा १५००/- कोविड अनुदान तात्काळ देण्यात यावे.
४)घरबांधणी करता साडेपाच लाख रुपये अनुदान द्या व घरकुल योजनेच्या अटी व स्टेप कमी कराव्या. घरकुल योजनेचे अर्ज मंजुर होऊन सुद्धा अध्याप घरकुल योजनेचा लाभ दिले जात नाहीत, तो तातडीने देण्यात यावा.
५)३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल केलेल्या साहीत्य खरेदीसाठीचे ५ हजार रुपये अध्याप कांही कामगारांना मिळालेले नाहीत. ते तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करा.
४) १८ ते ६० वयोगटातील कामगारांना नैसर्गिक मृत्यू लाभ पाच लाख रुपये व अपघाती मृत्यू लाभ दहा लाख रुपये द्या.
६) 60 वर्षे वयावरील कामगारांना महिना रुपये 5000/ पेन्शन मिळाली पाहिजे
७)ऑनलाईन नोंदणी/ नुतणीकरणामधील सर्चिग पद्धतीने होणारा भ्रष्टाचार थांबवा.
८) बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला व कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट थांबवा. व नोंदणीकृत कामगार संघटनेला प्राधान्य द्या.
९) भांड्यांच्या अनुदानाची रक्कम किमान ₹ १००००/- कामगारांच्या खात्यावर ताबडतोब टाकावे.
१०) ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यावर आणि त्रुटी दूर केल्यास ८ दिवसात तपासून कामगारांना स्मार्ट कार्ड द्यावे. तसेच नुतनीकरण केलेल्या कामगारांना पावती दिली जाते त्यानाही स्मार्ट कार्ड देण्यात यावे.
११) १ जुन २०२१ रोजी मंडळाकडे साधारण ४ हजार ३०० हुन अधिक, १५०० रूपयाची कोविड अनुदान मिळण्यासाठी पात्र कामगारांची यादी मंडळाकडे पाठवुन सुद्धा मंडळाने अध्याप त्या कामगारांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली नाही ती ताबडतोब करावी.
१२) नोंदीत महिला कामगारांना मातृत्व लाभ म्हणजे ६ महिने महिना ३००० रुपये अनुदान मिळावे.
१३) नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या लग्नाकरीता १ लाख रुपये अनुदान द्या.
१४) ज्या कामगारांची मुले एम फील, पी एच डी व तत्सम शिक्षण घेत असतील त्याना त्यांच्या खर्चाएवढे अनुदान देण्यात यावे.
१५) शैक्षणिक व विविध योजनांचे अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसात कामगाराच्या खात्यावर रक्कम जमा करावी. व शैक्षणिक योजनांच्या रकमेत वाढ करा.
१६) नोंदीत कामगारांचे कुटुंबिय कींवा नोंदीत कामगार यांनी कोविड उपचार घेतला असल्यास त्यांना गंभीर आजाराचा लाभ द्या.
१७) लाभ वाटपाचे सर्व अधिकार स्थानिक कार्यालयांना द्या.
१८) ग्रेस पिरेड मधील कामगारांना नैसर्गिक, अपघाती मृत्यू लाभ,देण्यात यावेत त्यासंबंधी आदेश करावा.
१९) २३ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयाचा गैरअर्थ काढुन ग्रामसेवकांनी दाखले देण्याचे बंद केले आहे, त्यासंबंधी सर्व जिल्हा परीषदेंना आदेश करावा व दाखले देण्याचे आदेश द्यावेत
वरील मागण्याबाबत आपण तात्काळ निर्णय करावा ही विनंती.
२०) मध्यान्ह भोजन योजनेचे जेवन वेळेत मिळत नाही, जेवनाचा उग्र वास येतो, गुळ, लोणचे, कोशिंबिर मिळत नाही, तक्रार करूनही त्यामध्ये सुधारणा होत नाही, त्यामुळे मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीना ५ हजार रुपये द्या.
२१) कामगारांना योजना मंजुर झाल्याचे मेसेज येतात पण प्रत्यक्षात बॅक खात्यावर पैसे जमा होत नाहीत.
२३)ज्या बॅकाचे विलीनीकरण झालेले आहे त्या बॅकाचे पैसे जमा होत नाहीत त्यामध्ये उपाययोजना करा.
२४)निवृत्तीचे वय ६० ऐवजी ६५ करा व साठ वर्षानंतर पाच हजार रुपये पेन्शन द्या.
२५)कामगार कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरा व मंडळाकडील कंत्राटी कामगारांना कायम करा.
२६)बांधकाम कामगारांना कामावर जाण्यासाठी सायकल द्या.
२७)अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांना तात्काळ घरबांधणीसाठी अनुदान द्या.
२८) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर सिटुचा प्रतिनिधी घ्या.
२९) कोविडने मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना ५ लाख रूपये अर्थसहाय्य करा.