कागल : ” शाहू साखर ” मार्फत पै.पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
तब्बल २१वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा बहुमान कुस्तीपंढरी कोल्हापूरला पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी मिळवून दिला. याबद्दल येथील शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शाहु ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते रोख रु.५० हजार शाल,व श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला.
व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील, यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे कारखान्याचे संचालक,संचालिका यांची उपस्थिती होती
यावेळी श्री घाटगे म्हणाले,लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांनी लाल मातीतील कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु ही लोप पावत चाललेली कुस्ती कला जिवंत ठेवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने शाहू कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी केले.
शाहू साखरचे अनेक मानधनधारक मल्ल आज राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले असून असून त्यांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे. पैलवान पृथ्वीराज पाटील याने यामध्ये भर घातली आहे
पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा सुपुत्र पैलवान पृथ्वीराज पाटील भविष्यात निश्चितच
ओलंपिक पदक पटकावेल अशी इच्छा व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस त्यांनी शाहु ग्रुप मार्फत शुभेच्छा दिल्या.