श्री.एच.आर.शिंदे यांनी समर्पित भावनेने ज्ञानार्जनाचे काम केले : माजी आमदार संजयबाबा घाटगे

गारगोटी प्रतिनिधी :
श्री.एच.आर.शिंदे यांनी समर्पित भावनेने ज्ञानार्जनाचे काम केले. त्यांनी सेवानिवृत्ती नंतरही समाज शिक्षकांची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन अन्नपुर्णा शुगरचे चेअरमन, माजी आमदार श्री. संजयबाबा घाटगे यांनी केले.
भुदरगड शिक्षण संस्था गारगोटी, संचलित गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एच.आर.शिंदे यांच्या सेवानिवृती समारंभात माजी आमदार संजयबाबा घाटगे अध्यक्षस्थानी बोलत होते.
यावेळी सदगुरु कबीर जगदीश धाम, मडिलगे बुद्रुकचे महंत श्री. शिवमुनि शास्त्री साहेब, इंडियन इन्स्टिट्यूट, पुणेचे मेंबर सेक्रेटरी डॉ. जयंत कळके, व्ही. एम. पाटील, वजीर मकानदार यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, भुदरगड शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. शिवाजीराव चोरगे, प्रकाश कुलकर्णी, श्रीमती सुवर्णा भास्कर ठाकूर, मुख्याध्यापक ए. एम. पाटील, आर. वाय. देसाई, मुख्याध्यपिका सौ.सुवर्णा खोत, नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक पी.जी.कुलकर्णी, डी.जी. लकमले, जी डी. ठाकूर, एस. एस. नाईक, आर. पी. गव्हाणकर, प्रा.शेखर देसाई, डी.एस.ससे, एस.एम.साळवी, श्रीमती एन. एम चांदके, श्रीमती आर. आर. बहादुरे, प्रा.सौ.तृप्ती पाटील, प्रा.सौ.स्नेहा साळोखे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, श्रीमती मेघा चव्हाण पाटील, अमृत देसाई, विजय स्मार्त यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी आभार कडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. वाय. देसाई यांनी सूत्रसंचालन आर. डी. पोवार यांनी केले.