मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी जागृत असणे गरजचे : वसंतराव पाटील

तरसंबळे प्रतिनिधी :
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी जागृत असावे असे प्रतिपादन एस. एम. जोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अद्यक्ष व भोगावतीचे माजी संचालक वसंतराव पाटील (बापू)यांनी केले.ते कंथेवाडी (ता.राधानगरी) येथील आमदार शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालयामार्फत आयोजित शिक्षक,पालक,सभेत बोलत होते.
पाटील पुढे म्हणालेत “विद्यार्थ्यांना भौतिक सुधारणा देण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडलो नाही.सार्वजनिक वाचनालयाचा वापर करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या विचारांचा आदर्श जपण्याचा वारंवार प्रयत्न होत असतो.
प्रारंभी वर्गशिक्षक एस. आय.मणेर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.या वेळी माजी सभापती वंदना पाटील मुख्याद्यापक बी.जी.पाटील,बी.आर.कुणकेकर, सी.बी.मोरे,बी.एम. वडार,एस. जी.चौगले,आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक टी. एल. किल्लेदार,यांनी तर आभार एस. एस.पाटील यांनी मानले.