पांडूरंग विकास सेवा संस्थेने सहकारात नवे पर्व उभारले : उत्तमराव वरुटे; सभासदांना ९ % लाभांश वाटप

सावरवाडी प्रतिनिधी :
सहकारी चळवळीच्या माध्यमातून शेतक ऱ्याचे हित जोपासले जाते . पांडूरंग विकास संस्थेने गेल्या पन्नास वर्षात सहकारी चळवळीत विकासात्मक नवे पर्व उभे केले . असे प्रतिपादन कुंभी कासारी साखर कारखाण्याचे संचालक उत्तमराव वरुटे यांनी केले .
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील पांडूरंग सहकारी विकास संस्थेच्या आयोजित संस्था सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अमीत वरुटे होते .
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते संस्था सभासदांना नऊ टक्केप्रमाणे ५ लाख ६० हजार ९८९ रक्केमेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन अमीत वरुटे , माजी सरपंच शिवाजीराव वरुटे , मधुकर हळदकर , सचिन पानारी , चंद्रकांत वरुटे, आकाराम गावडे , मारूती वरुटे सुमित पाटील , उद्धव चव्हाण आदिनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक संस्था सचिव आदिनाथ कुंभार यांनी केले . शेवटी पांडूरंग जाधव यांनी आभार मानले . यावेळी संस्थेचे सभासद कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.