पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर हे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आज आले आहेत. कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीने पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांचे करवीर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती ताराराणी चौकात दीपक केसरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी “शिवसेना जिंदाबाद” “जय शिवाजी जय भवानी” अशा जोरदार घोषणा देत छत्रपती ताराराणी चौक परिसर दणाणून सोडला. पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांच्या स्वागतासाठी हलगीचा ठेका आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी यावेळी करण्यात आली.
यावेळी,राजेश क्षीरसागर,खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, शिवसेना महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, रमेश खाडे, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, शहर समन्वयक सुनील जाधव, युवासेना युवा संपर्क अधिकारी प्रसाद सुजित चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी अॅड.चेतन सुदर्शन शिंदे, शहर युवा अधिकारी पदावर पियुष मोहन चव्हाण, शहर युवा सरचिटणीस सुनील उर्फ दादू प्रभाकर शिंदे, आय.टी.सेलच्या शहर अधिकारी सौरभ शिवदत्त कुलकर्णी, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश पोवार, जिल्हा समन्वयक विक्रम पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, शहरप्रमुख राजेंद्र पोवार, फेरीवाले शहरप्रमुख अर्जुन आंबी यांच्यासह शिवसेना, युवासेना, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.